काटी , दि . १८
तुळजापुर तालुक्यातील सांगवी ( काटी ) जिल्हा परिषद शाळा व्यावस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष मगर तर उपाध्यक्षपदी शरद मगर यांची पालक बैठकीत अविरोध निवड शनिवारी करण्यात आली .
कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा व्यावस्थापन समितीला शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती नवीन परी पत्रकाप्रमाणे नव्याने समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले होते शनिवारी मुख्याद्यापक पी पी सगर यानी समिती निवडीसाठी पालकाची बैठक बोलावण्यात आली या बैठकीत अध्यक्षपदी संतोष मगर उपाध्यक्षपदी शरद मगर तर सदस्य म्हणुन मिलींद मगर , रवि मगर विश्वजीत पाटील निलावती माळी छाया मगर गोपाळ माळी सुनंदा गुंड विष्णु मगर आदी १३ सदस्याची निवड अविरोध करण्यात आली.
या बैठकीला सरपंच ललिता मगर उपसरपंच मिलिंद मगर विश्वास मगर माजी सरपंच बाबूराव मगर रघुनाथ मगर दादाराव मगर सुखदेव शेळके राधा मगर सुमीत मगर जोतिबा जाधव अमोल कविटकर रोहीणी कापसे आदी पालक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नुतन शाळा व्यावस्थापन पदाधिकाऱ्याचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला आभार जोतीबा जाधव यानी मानले.