जळकोट,दि.२६ : मेघराज किलजे


येथून जवळच असलेल्या आष्टा (कासार) व जेवळी  (ता.लोहारा ) येथे माजी पंतप्रधान,भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन करण्यात आले. 



 सुशासन दिनानिमित्त भाजपा जिल्हाअध्यक्ष  नितीन काळे व लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, तसेच मोदी सरकारच्या कामगिरीवर माहिती देण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली . आष्टा कासार येथील जेष्ठ कार्यकर्ते गहीनाथ कागे (माजी सैनिक) , काशीनाथ घोडके (मा.जिल्हा उपाध्यक्ष ,ओबीसी मोर्चा) व जेष्ठ  कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला . जेवळी येथील उदय कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला .

यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख भाजपा जयेश सुर्यवंशी, आष्टा कासार शाखा अध्यक्ष महादेव कोरे , बसवराज कोंडे , अमित पोतदार,  चतुर्भुज कागे, राजू गायकवाड , म्हाळप्पा गाडेकर, महादेव लोहार, प्रविण हारके , महिला, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top