नळदुर्ग , दि . १७ : विलास येडगे  

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री युवा सेनाप्रमुख आदित्य  ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली , धाराशिव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेना उपनेते आ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते, तसेच उस्मानाबाद  जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख आ. कैलासदादा पाटील, आ. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर जि. प.गटातील इटकळचे अझहर मुजावर व नंदगाव जिल्हा परीषद गटातुन जनशुभदा फाऊंडेशनचे संस्थापक . सोमनाथ गुड्डे तसेच त्यांच्या समवेत अशपाक मुजावर ( इटकळ),   अमोल धर्मराज मुळे (सराटी) गणेश कांबळे (ग्रा. पं. सदस्य केशेगाव),  प्रवीण बिराजदार, , सिद्धाराम पाटील,  कोंडाजी खुदादे,,  इन्नुस मकानदार,  परमेश्वर कांबळे,  मल्लिनाथ गुद्दे,  इस्माईल पठाण,  अफजल मुजावर,  बाबासाहेब गायकवाड,  अल्तमश मुजावर,  रणजीत कदम,  दौलत गुद्दे,  खाजाभाई खुदादे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला व पुढील काळात एक शिवसैनिक म्हणुन निष्ठेने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी काम करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले. 


     
तुळजापूर तालुक्यातील पक्षसंघटन बळकट होण्यासाठी  तानाजी सावंत, खा. ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटिल, आ. ज्ञानराज चौगुले  यांनी जी ताकद व विश्वास दिला त्याबद्दल तुळजापूर शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. यावेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती   दत्ता  साळुंखे, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, शिवसेना नेते ॲड. गजानन चौगुले, उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, युवासेनेचे सुनील कदम, विभागप्रमुख अनील भोपळे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top