नळदुर्ग, दि . १२

 तुळजापूर फाटा ( गोलाई )  ते अक्कलकोट रोड पर्यंत रस्ता  करण्यात  आलेल्या महामार्गावर वाहनधारकाना सोयीचे होईल म्हणून विविध मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकवेळा पाठपुरावा केल्याने   गोलाई ते बसस्थानक पर्यंतच्या महामार्गावर ब्लिंकर लाईटच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र   नव  निर्माण सेनेच्या  मागणीला यश आले आहे. याबाबत नागरिकातुन मनसेच्या पदाधिका-याचे आभिनंदन  होत आहे.


 मनसे कार्यकर्त्यांनी  विविध मागण्या संबंधित विभागासमोर मांडल्या होत्या, त्यात लोखंडी पुल, भवानी नगरला जोड़णारा रस्ता,जाळयाची ऊंची कमी करणे, रंबलर स्ट्रिप, गतिरोधक, रिफ्लेक्टड साइन बोर्ड, हिरवळ, झाड़े, हाइमास्ट, ब्लिंकर लाइट,स्ट्रीट लाइट,बगीचा,गोलाई येथील सर्कलचे सुशोभिकरण, जंक्शन,असे अनेक मागण्यासाठी गेल्या दीड वर्षा पासून पाठपुरावा सुरु केला होता, त्याचाच एक भाग म्हणून संबधित विभागाने मनसेची पाचवी मागणी मान्य करत आज दि ९ डिसेंबर  रोजी गोलाई ते बसस्थानक पर्यंत वाहनधारकाच्या सोयीसाठी एकूण २३ ब्लिंकर लाइट बसविण्याचे काम सुरु केले आहे .


 विशेष त्या कामाचा शुभारंभ मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष   अलिम शेख, शहर सरचिटणीस  प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते पूजा करून नारळ वाढवुन शुभारंभ करण्यात  आला.
 
Top