काटी ,दि . १६ :  

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील  पांडुरंग अशोक रोकडे यांची कुराश  असोसिएशन महाराष्ट्र सलग्न पोलीस मित्र समितीच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 


त्यांना निवडीचे पत्र  कूराश असोसिएशन महाराष्ट्र संलग्न पोलीस समितीचे प्रदेशाध्यक्ष किरण गायकवाड यांनी दिले.त्यांच्या  निवडीबद्दल  सांगवी (काटी) येथील ग्रामस्थांच्या वतीने आई तुळजाभवानी मातेची  प्रतिमा देऊन त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top