वागदरी , दि . ०४

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील विजयी स्तभांची भव्य प्रतिक्रती करून नळदुर्ग येथे भिमसैनिकांच्या वतीने शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली.


   दि.१ जानेवारी १८१८ रोजी २८००० पेशवाईच्या सैनिका विरुध्द पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील भिमा नदीकाठी झालेल्या ऐतिहासिक लढाईत ५०० महार सैनिकांनी विजय मिळविला. तो दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येत असून त्यांच्या विजयाची आठवण म्हणून त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मृती विजयी स्तंभास १ जानेवारी शौर्य दिनाचे  औचित्य साधून कोरेगाव भिमा येथे लाखो भिमसैनिक विजयी स्तभांस मानवंदना देण्याकरिता जमा होतात. 


त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग येथील भिमसैनिकांनी ऐतिहासिक विजयी स्तभांची प्रतिक्रती बनवून मानवंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित भिमसैनिकांनी विजयी स्तभांस मानवंदना दिली.
   यावेळी जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद कांबळे, बाबुराव बनसोड,  रिपाइं(गवई)चे तालुका अध्यक्ष प्रमोद लोंढे, सामाजिक कार्यकर्ते मारूती खारवे, सेवानिवृत्त  पी.एस.आया चंद्रकांत कांबळे ,माजी सैनिक पद्माकर पुजारी, प्रमोद गायकवाड, सचिन कांबळे,बापु दुरुगकर, बंटी कांबळे,  आदीसह कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top