नळदुर्ग , दि . ०४
नळदुर्ग येथिल जि. प. प्रा. शाळा इंदिरानगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालीका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती कल्पना गायकवाड यांच्या तर्फे शाळेतील सर्व मुलीना पेन्सील वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला शिक्षणाचे महत्व त्यानी सांगीतले. या कार्यकमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय घंटे , भूजबळ , जमादार , भूरे , शेख तसेच अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती घोडके , म्हेत्रे आदी उपस्थित होत्या.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नळदुर्ग येथील रेणुकामाता शिवभोजन थाळी केंद्र येथे सौ. कल्पना गायकवाड यांनी रामतीर्थ येथील ओमसाई महिला बचत गटाच्या बंजारा समाजाच्या महिलांना महिला दिनाचे व महिला शिक्षणासाठीचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगुन बंजारा समाजाच्या महिलांचा गुलाबाचे फुल देवुन स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
ओमसाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा ललिता चव्हाण, सचिव मनिषा व्यंकट राठोड, छाया फुलचंद राठोड, वालाबाई बाबु चव्हाण , इंदुभाई सुभाष राठोड, स्वाती दिनेश चव्हाण कविता व्यंकट चव्हाण, शारदाबाई तुकाराम राठोड, प्रियंका वामन चव्हाण, मंजुळा रवी राठोड आदी उपस्थित होत्या.