नळदुर्ग , दि . ०३ : 

राजीव गांधी विद्यालय हंगरगा (नळ ) ता. तुळजापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


 सर्वप्रथम शालेय परिपाठ नंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  सरपंच अतुल कलशेट्टी, उपसरपंच दयानंद चौगुले यांच्या हस्ते तर संजय वाघोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .  त्यानंतर विद्यालयातील शिक्षक प्रवीण गुरुव यांनी संक्षिप्त  चरित्र वाचन केले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे भाषणे झाली.  विद्यालयातील विद्यार्थिनीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ ,झाशीची राणी लक्ष्मीबाई ,रमाबाई इत्यादी थोर भारतीय स्त्रियांची वेशभूषा करण्यात आली.


 त्यानंतर गावातील महिला ग्रामपंचायत सदस्य नागरबाई कलशेट्टी ,अंगणवाडी शिक्षिका श्रीमती महानंदा हत्ते , अंगणवाडी कार्यकर्त्या श्रीमती अंजली चव्हाण ,राजीव गांधी विद्यालयातील पोषण आहार विभाग सांभाळणाऱ्या श्रीमती सुरवसे ताई यांचा विद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  बनसोडे  तर आभार प्रवीण गुरव  यांनी मानले.
 
Top