कळंब , दि . ०३
तालुक्यातील हसेगाव केज येथील जि. प. प्रा. शाळेत दि.03 जानेवारी रोजी बालिका दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून सातवीची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून पौर्णिमा राऊत व सिद्धी मंडळ यांची निवड करण्यात आली, तर सूत्रसंचालन कुमारी शिवाणी पाटील व सायली सोनटक्के यांनी केले.
याप्रसंगी शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यात विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून सावित्रीबाई फुले व आनंदीबाई जोशी यांच्यावर भाषणे केली, यानंतर वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये पहिली ते सातवीच्या मुलांनी भाग घेतला सावित्रीबाई फुले ज्योतीराव फुले,शेतकरी अशा विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या या कार्यक्रमात शाळेतील 140 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . तसेच शाळेतील शिक्षिका श्रीमती लक्ष्मी कोकाटे व विद्या मनगिरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर ओव्या गायल्या ,याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री .समाधान भातलवंडे व श्री अमोल बाभळे यांना विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या,जिलेबी वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री रामेश्वर जगदाळे श्री प्रशांत घुटे,श्री विकास खारके, श्री समाधान भातलवंडे,श्री अमोल बाभळे,श्रीम लक्ष्मी कोकाटे विद्या मनगिरे,कालिंदा समुद्रे, प्रतिभा बिडवे यांनी परिश्रम घेतले.