काटी , दि . ०३
माळुंब्रा ता . तुळजापूर येथील प्रगतशिल शेतकरी तथा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रा. हेमंत वडणे यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था औरंगाबाद विभागाच्या संघटकपदी निवड करण्यात आली आहे. ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदूमाधव जोशी यांच्या प्रेरणेने काम करणार्या ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या लातूर जिल्हा कार्यालय तथा ग्राहक सेवा केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी औरंगाबाद विभागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
या निवडीत औरंगाबाद विभाग संघटकपदी प्रा.हेमंत वडणे यांची निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र व सत्कार संघटनेचे अध्यक्ष .डाॅ विजय लाड (नांदेड) व जिल्हापुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे लातूर यांच्या हस्ते करण्यात आला.
गेल्या 15 वर्षापासून अधिक काळ ग्राहक संघटन, प्रबोधन व मार्गदर्शन तसेच माहिती अधिकारचे शासन संस्था यशदा मार्फत प्रशिक्षक, पतंजली योग समितीचे योग प्रशिक्षक म्हणून आदी विविध सामाजिक कार्यात उस्मानाबाद, लातूर जिल्हात प्रा.हेमंत वडणे सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राज्य सहसंघटक सौ.मेधा कुलकर्णी, विभाग अध्यक्ष सतिश माने, संघटक बालाजी लांडगे (नांदेड),लातूर जिल्हाध्यक्ष डाॅ.प्रल्हाद तिवारी व जिल्हातील कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सचिव अरुणजी वाघमारे( पुणे),राज्यपदाधिकारी सर्जेराव जाधव ,प्रमोद कुलकर्णी, डाॅअजय सोनवणे (नाशिक) प्रा एस.एन.पाटील (सिंधुदुर्ग)यांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्हा पुरवठाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी फसवणूकी विरोधी संकोच न बाळगता ग्राहक आयोगाकडे दाद मागावी. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी ग्राहक कायद्यातील नवीन बदलाची माहिती लोकांपर्यत पोहोचवावी व प्रशासनास ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले . डाॅ.विजय लाड यांनी नवनियुक्त पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी व्यक्तीगत स्वार्थ न करताग्राहकाचे प्रश्न सोडविण्यासाठी व बिंदूमाधव जोशी यांच्या विचारातील शोषण विरहीत समाज निर्मितीसाठी कार्य करावे असे सांगितले . मेधा कुलकर्णी,बालाजी लांडगे यांनी देखील मार्गदर्शन केले.