जळकोट , दि . ०३


जळकोट ता . तुळजापूर  येथील कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.


प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आलियाबादच्या सरपंच ज्योतीका चव्हाण , प्राचार्य संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच शाळेतील महिला शिक्षिका, विद्यार्थीनी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी थोर भारतीय स्त्री, पुरुष ‌यांच्या वेशभूषा करून विविध सामाजिक उपक्रम साजरा केले.



यावेळी शरद सुर्यवंशी, नागेंद्र गुरव,रवि चव्हाण, सुरेश कोकाटे, बाळासाहेब मुकम,देवानंद पांढरे, बी.जे. हाके, किरण ढोले, बालाजी राठोड, संतोष ‌दुधभाते, आप्पासाहेब साबळे, पाटील, कारले, पाठक, राठोड, प्रमिला कुंचगे, कल्पना लवंग, अमित खारे यांच्या सह शिक्षकवृंद उपस्थित होते.
 
Top