तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा शेळगाव ज्युनिअर कॉलेज शेळगाव (आर.) (ता. बार्शी) येथे जीवशास्त्र या विषयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या किसन शंकरराव साळुंके यांच्या सुनबाई सौ.अनिता बाळासाहेब साळुंके/मोहिते यांना भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी बहुउद्देशीय पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या आदेशानुसार योगाचे क्रांतिकारक कार्य व आदर्श शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय आदर्श कृतीशील शिक्षका पुरस्कार जाहीर करण्यात आला.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राध्यापिका अनिता बाळासाहेब साळुंके/मोहिते (काटीकर) यांनी जीवशास्त्र विषयाच्या उत्कृष्ट अध्यापनाबरोबरच योगाचं मार्गदर्शन करून त्यांनी हजारो नागरिकांना, विद्यार्थ्यांना विनामूल्य शरीर संपत्ती मिळवून दिली व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच विद्यार्थ्यांबरोबर योगाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. इतर कार्याचा आढावा घेऊन सोलापूर जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने योगाचे क्रांतिकारक कार्य व "आदर्श कृतीशील शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार" निवड पत्र देऊन जाहीर करण्यात आला.
प्राध्यापिका अनिता साळुंके,मोहिते या बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे त्या शेळगाव (आर) जुनियर कॉलेज शेळगाव येथे आदर्श शिक्षिका म्हणून काम करतात त्यांना या अगोदर त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श गूणवंत शिक्षिका पुरस्कार व इतर पुरस्कार पण मिळाले आहेत यावेळी
या निवडीबद्दल राष्ट्रीय विश्वगामी माध्यमिक शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक तथा संपादक अंकुश आतकर, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख वसंत कांबळे, पत्रकार सुहास कांबळे, सोलापूर जिल्हा सल्लागार दत्तात्रय ननवरे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिश्चंद्र गाडेकर, पंढरपूर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्याबरोबर पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मिळालेल्या पुरस्काबद्दल कौतुक होत आहे.