काटी , दि . ०३


 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने  ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी  दहा वाजता देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करुन   स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले  यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
      

 प्रारंभी सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. यावेळी सरपंच आदेश कोळी यांच्यासह सर्व ग्रामपंचाय सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top