जळकोट , दि.३ 

         
तुळजापूर तालुक्यातील केंद्र होर्टी अंतर्गत असणाऱ्या जळकोटवाडी (नळ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि .३ जानेवारी रोजी   बालिका दिन म्हणून  जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा, जळकोटवाडी ( नळ) येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन विद्यार्थीनींच्या हस्ते करण्यात आले. नंतर  सावित्रीबाई फुलेंच्या  लेकींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले . 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना  उमेश भोसले यांनी सांगितले. बालिका दिनानिमित्त शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली .महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेशभूषेत पाहून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  उमेश भोसले , सहशिक्षक  अशोक राठोड यांची उपस्थित होती.
 
Top