वागदरी , दि . ०३

तुळजापूर तालुक्यातील वागदरी व परिसरात वेळ आमवस्या  सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून शेतकऱ्यांनी यानिमित्ताने  कुटुंबासह मित्रपरिवार ,नातेवाईका समवेत घेतला सह भोजनाचा आनंद.


   
 ज्या शेतजमीनीत शेतकरी अन्न धान्य पीकवतो आणि आपल्याला जगवतो असा त्या शेतजमीला वर्षातून एकदा वंदन करण्याचा सण म्हणजे वेळ आमवस्या या निमित्ताने शेतकरी कुटुंब वेगवेगळे पदार्थ करून शेतात  भोजनासाठी घेवून जातात.भोजनासाठी खास करून खिर,भज्जी, बाजरीचे उंडे , शेंगदाणेची पोळी, अंबिल (मठ्ठा),वरणभात, वगैरे बनविले जातात. काळ्या आईची ओटी भरण्याचा अर्थात पूजा करून तिला वंदन करण्याचा सण म्हणजे वेळ आमवस्या होय. शेतातील लक्ष्मीची पुजा करून सहकुटूंब , मित्र परिवारसह भोजनाचा आनंद घेतला.


एकमेकांच्या शेतात जावून आवडीने अंबिल पितात. अशा पध्दतीने हा सण वागदरी व परिसरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 
Top