चिवरी , दि .२५
पंतप्रधान घरकुल आवास योजना ( ग्रामीण) अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि .२४ जानेवारी रोजी पासून पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या प्रपत्र ड याद्या सर्वेक्षण चालू करण्यात आली आहे.
यामध्ये गावातील पक्क्या घराची गरजू कुटुंबाच्या घराची सचित्र माहिती घेण्यात येत आहे, या सर्वेक्षणासाठी कमिटी अध्यक्ष दलभंजन( आयसीडीएस सुपरवायझर), सचिव गोरोबा गायकवाड ( ग्रामसेवक), सदस्य धनवंतर गायकवाड (तलाठी), उपसरपंच बालाजी पाटील, रोजगार सेवक तानाजी जाधव, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, उषाबाई नगदे, मदतनीस हिरकणाबाई लोहार, रेशमा चिमणे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे आदी काम पहात आहेत.