मुरूम, ता. उमरगा, दि. २५ :
माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान नोंदणी व जनजागृती अभियान अंतर्गत राष्ट्रीय मतदान दिन मंगळवारी दि. २५ रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते मतदान नोंदणी व जनजागृती अभियानाच्या पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. लोकशाही आणि निवडणुका या विषयावर प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. दिनकर बिराजदार, प्रा. प्रकाश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. राम बजगिरे, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. अविनाश मुळे, डॉ. रमेश आडे, डॅा. भिलसिंग जाधव, प्रा. सुजित मटकरी, डॉ. किरण राजपूत, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. विलास खडके, प्रा. लखन पवार आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सामुदायिक मतदान प्रतिज्ञेचे वाचन डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले. विजयालक्ष्मी भालेराव, सुरेखा पाटील, दत्तु गडवे, राजू ढगे, सुभाष पालापूरे, महादेव पाटील, पूजा शिंदे, शुभांगी कुलकर्णी, अंबिका पाताळे, निकिता पाताळे आदींनी सहभाग घेवून पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रवी आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर पंचगल्ले तर आभार डॉ. किरण राजपूत यांनी मानले.