गुंजोटी, दि .२५:
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘मतदार राजा जागा हो, प्रगतीचा धागा हो’, ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वाचा सहभाग’, ‘एकच लक्ष मताचा हक्क’ अशा विविध फलकासह मंगळवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गावातून मतदार जनजागृती रथाची फेरी काढण्यात आली.
प्रारंभी गावच्या सरपंच सरस्वती कारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी, ग्रामपंचयात सदस्य योगेश शिंदे यांच्या हस्ते रथफेरीला झेंडा दाखवून सुरुवात झाली. प्रा. राजाराम निगडे यांनी मतदानाविषयी प्रतिज्ञा देऊन मतदानाविषयी जास्तीत जागृती करण्याविषयी आवाहन केले. आपल्याला मिळालेले मतदान ओळखपत्र म्हणजे या देशाचे आपण नागरिक असल्याचा तो सन्मान आहे. लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मतदान आवश्यक असून, लोकशाही अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी मतदानाचा मूलभूत हक्क नागरिकांना बजावायलाच हवा, असे प्रतिपादन डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
रासेयोचे कार्यक्रमाधिकारी रामदास कोळी, डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डॉ.सुनील पतंगे, डॉ. महादेव खोत, डॉ. गुलाब राठोड, प्रा.दस्तगीर पठाण, डॉ. अनिल काळदाते, डॉ. रमेश मादळे, डॉ. दिगंबर चव्हाण, डॉ. भाऊसाहेब ऊगले, प्रा. इब्राहिम इनामदार, अधीक्षक विनोद पतंगे, प्रा. सूर्यकांत कोड़े, प्रा. कलीम शानेदिवान, प्रा. डॉ. कल्याण कदम, सतीश कारे, सिद्राम देशमुख आदी उपस्थित होते.