तुळजापूर ,दि .२५
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सामुहिक प्रतिज्ञा वाचन करण्यात आले. दि . २५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती, याच अनुषंगाने या दिनाचे विशेष महत्त्व आहे. पात्र मतदारांच्या मतदानामध्ये वाढ होणे,मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया लोकांनी गांभीर्याने घेणे अशा प्रकारच्या ऊद्देशांना अनुसरून शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात आला,
याप्रसंगी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर हे होते.तर प्रतिज्ञेचे वाचन प्रा.डॉ.बी.डब्ल्यू गुंड यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.ए.बी.वसेकर , कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.वागदकर एस.पी यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे आभार प्रा.जे.बी.क्षीरसागर यांनी मानले.सदर कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन संपन्न करण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.