तुळजापूर , दि . २५ : 


 बारुळ ता . तुळजापूर येथिल श्री बाळेश्वर  विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.


त्यामध्ये मतदान प्रक्रिया, निबंध स्पर्धा, रांगोळी रेखाटन व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. मतदान प्रात्यक्षिक प्रक्रियेत मतदान अधिकारी म्हणून  सार्थक यावलकर, शंभू यावलकर, वैष्णवी सगर व सानिका रणदिवे यांनी कामकाज पाहिले. इतर विद्यार्थी, पत्रकार सोमनाथ शेटे, B. L. O. बबन लाखाडे (सह शिक्षक) , विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश अणदुरकर ज्येष्ठ शिक्षक हजारे सर,नाईक सर,बलसुरकर सर व  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. रांगोळी व निबंध स्पर्धेत प्राची वट्टे, मयुरी यावलकर, गौरी व्होर्टे, वैभवी कडबाने, शिवाणी जमादार, रिया नारायणकर व संजीवनी गोरे यांनी सहभाग नोंदविला. 


तसेच पोस्टर स्पर्धेत मयुरी यावलकर, सार्थक यावलकर, शिवानी जमादार व गौरी व्होर्टे  यांनी सहभाग नोंदविला. शेवटी मतदान प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.
 
Top