नळदुर्ग , दि . ०१

नळदुर्ग शहर पञकार संघनेच्या सन २०२२ या वर्षीच्या  नुतन  कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आल्याने नुतन पदाधिका-यासह सदस्याचे मान्यवराकडुन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले.


 शहर महिला काँग्रेसच्या सौ. कल्पना राजेंद्र गायकवाड   व   सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती छमाबाई धनाजी राठोड यांच्या वतीने नवनिर्वाचीत नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या पदाधिकरी तथा सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

नुकतेच नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल नळदुर्ग शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. कल्पना राजेंद्र गायकवाड  यांच्यावतीने  शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष  सुहास येडगे , उपाध्यक्ष  आयुब  शेख , सचिन सुनिल  गव्हाणे , कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे , प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक  आदी नुतन पदाधिका-यांचा फेटा  बांधुन पुष्पहार व लेखणी देवुन सत्कार  करुन  शुभेच्छा  दिल्या. या कार्यक्रमास राजेंद्र गायकवाड , बंडू पुदाले ,  शिवाजी गायकवाड , 
 पञकार  विलास येडगे , तानाजी जाधव , उत्तम  बनजगोळे ,  दादासाहेब बनसोडे  आदीजण उपस्थित होते.यावेळी  प्रास्ताविक  तानाजी जाधव तर आभार कल्पना गायकवाड  यानी मानले.

नळदुर्ग (वसंतनगर) येथे नवनिर्वाचीत पदाधिका-यासहसर्व पञकार सदस्याचा
 नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती छमाबाई राठोड यांच्या वतीने फेटा , पुष्पहार , लेखणी देवुन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी  पञकार संघटनेचे अध्यक्ष  सुहास येडगे ,  उपाध्यक्ष  श्रीनिवास भोसले , सचिव  सुनिल गव्हाणे ,   प्रसिध्दी प्रमुख  शिवाजी नाईक , सदस्य विलास येडगे , प्रा. पाडुरंग पोळे ,  दादासाहेब  बनसोडे, सुनिल बनसोडे , उत्तमबनजगोळे ,  तानाजी जाधव,  अजित चव्हाण , शोएब काझी , मुज्जमिर शेख  आदीचा सत्कार करण्यात आला. यावेळी  धनाजी राठोडसह वसंतनगर येथिल प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 
Top