जळकोट, दि. ०१
जि.प.प्राथमिक शाळा, वागदरी (ता.तुळजापूर) येथे शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली असून ,अध्यक्षपदी रामसिंग देवसिंग परिहार तर उपाध्यक्षपदी सौ.विजयाबाई सुर्यकांत वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
येथील जि.प.प्राथमिक शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पालक सभा संपन्न झाली. या पालक सभेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी रामसिंग परिहार व उपाध्यक्षपदी सौ विजयाबाई वाघमारे याचीं निवड करण्यात आली तर सदस्यपदी योगेश सुरवसे,दिपक वाघमारे, शरद पवार, सविता शिवाजी पाटील, प्रणिता सचिन पाटील, पार्वती बिराजदार, सुगंधा वाघमारे तर शिक्षण प्रेमी सदस्य प्रमोद सोमवंशी यांची निवड करण्यात आली.नुतन समितीचे ग्रामस्थांच्यावतीने आभिनंदन करण्यात आले.