वागदरी , दि . ०१ :एस.के.गायकवाड
सन २०१८ मध्ये कोरेगाव भिमा पुणे प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर नान्यालयातील खटले मागे घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून ते सर्व खटले मागे घेण्यास भाग पाडू असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी नळदुर्ग येथे कार्यकर्त्यांशी बोलताना केले.
कराळी ता.उमरगा येथील कपिलवस्तू बुद्ध विहार येथे बुद्धीस्ट चॕरीटेबल ट्रस्ट कराळीच्या वतीने आयोजित बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन प्रसंगी चंद्रकांत हंडोरे हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता नळदुर्ग ता.तुळजापूर येथिल बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात त्यांचा नळदुर्ग येथील कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी कोरेगाव भिमा प्रकरणी न्यायालयात दाखल गुन्हे याविषयी प्रश्न उपस्थित केला असता ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. यावेळी डॉ. सतिश खारवे, प्रमोद कांबळे, मारुती बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, महादेव कांबळे , उमेश गायकवाड, प्रमोद लोंढे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.