काटी , दि . ०१

तुळजापूर तालुक्यातील काटीच्या इंदिरानगर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे पूनर्गठन शनिवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी पालक बैठकीत करण्यात आले.


यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळदाते ए.एल.यांनी पालक सभेचे औचित्य स्पष्ट केले आणि शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य स्पष्ट केले.  रचनेनुसार शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करावी असे आवाहन केले.  सर्व पालकांनी चर्चा व विचारविनिमय करुन नूतन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली,  


नूतन शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारींची निवड पालकसभेत सर्वसंमत्तीने करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सौ अश्विनी बालाजी बंडगर अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी  राजेश हनमंत  काकडे यांची एकमताने निवड करण्यात आली. नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम् काळदाते ए एल यांनी नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे व  शाळेचे शिक्षक  क्षीरसागर जे एस यांनी उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पालक सभेत नूतन अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी मुख्याध्यापिका काळदाते ए एल् यांनी सर्व उपस्थित पालकांचे आभार मानले या पालक सभेचे सूत्रसंचालन  क्षीरसागर जे एस  यांनी केले ही पालक सभा  यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यपिका श्रीमती काळदाते ए एल्, शिक्षक  क्षीरसागर जे एस यांनी परिश्रम घेतले. या पालक  सभेस गावातील्  नागरिक ,पालक , माता-पालक  उपस्थित होते.
 
Top