तुळजापूर , दि . ०१

  तुळजापूर खुर्द येथील "अमृतराव कदम" परीवाराच्यावतीने स्मशानभूमीची लोकसहभागातून साफ सफाई करण्यात आली.
यावेळी जे सी बी चा सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले तसेच  झाडे, झुडपे काढून रस्ता करण्यात आला.


    चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे , झुडपे उगवल्याने अडचण झाली होती. शिवाय परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी अतिक्रमण करून झाडे लावली होती. तसेच अडचणीमुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते. यासाठी नरेश अमृतराव यांचा पुढाकारातून जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीची साफ सफाई करण्यात आली. सुमारे  ४ तासाचा परीश्रमानंतर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी २०० मीटरचा रस्ता तयार करण्यात आला. 

   
यावेळी नरेश अमृतराव, उत्तम अमृतराव, सचिन अमृतराव, किरण अमृतराव,  महेश अमृतराव, अजय अमृतराव, शितल अमृतराव, संतोष अमृतराव, प्रदिप अमृतराव, अतुल अमृतराव, शरद अमृतराव आदींची उपस्थिती होती.  

 
Top