तुळजापूर, दि . ०२
शिवसेना उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख बाळ हरदास यांनी श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आई भवानीला साकडे घातले.
महाराष्ट्रातील सर्व जनतेला व शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावे, महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट दुर होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, त्याचबरोबर मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे याना चांगले आरोग्य लाभुन जनतेची सेवा करण्याची शक्ती दे, अशी महाराष्टाची कुलस्वामिनी .श्री तुळजाभवानी चरणी जिल्हा संपर्कप्रमुख बाळ हरदास यांनी
प्रार्थना केली. यावेळी तुळजापूर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.