मुरूम, ता. उमरगा, दि. २९ 


 अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना २६ वा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार (ता. २८) रोजी शिवा संघटना संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे, सातलींग स्वामी व शिवा संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शिवा संघटनेकडून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र कारभारी यांची निवड झाली.

 उमरगा तालुका कार्यकारिणी  अध्यक्ष अमर दत्तात्रय वाले, तालुका संघटक अमर येलगुंदे (स्वामी), लोहारा तालुका अध्यक्ष सतेश्वर चंद्रकांत ढोबळे यांची शिवा संघटना कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्ल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top