काटी , दि . २२ : उमाजी गायकवाड

 माळारान जमीनीवर ठिबक सिंचनाच्या आधारावर लागवड करून सेन्द्रीय खताचा . वापर   केलेल्या पेरू बागेतुन 3 लाख रुपयांचे उत्पादन पहील्यांदाच पदरात घेण्याचा यशस्वी प्रयोग तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील   तरूण शेतकऱ्याने यशस्वी केला आहे.

शेतकरी संतोष राऊत याने कोरोनाच्या लॉकडाऊन काळात  दोन वर्षापुर्वी वडीलोपार्जीत माळरान जमीनीत,  पावणेदोन एकर जमीनीत तैवान ( पिंक ) जातीच्या 1700 पेरूच्या रोपांची लागवड केली. पाण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय करीत रोपे चांगल्या प्रकारे जोपासली. रोपाची वाढ व फळधारणे पर्यंत रासायनिक खताला बगल  देत सेन्द्रीय शेतीसल्लागार बसवणप्पा मसुते यांचे मार्गदर्शनाखाली  उत्तमरित्या पेरूची बाग जोपासली. यंदा फळधारणेनंतर  पहील्या वर्षी 16 टन पेरूचे उत्पादन निघाले. प्रति किलो 17 रुपये ते 27 रुपये भाव बांधावर मिळाला 3 लाख रुपयांचे उत्पादन पदरात पाडण्याचा यशस्वी प्रयोग शेतकरी संतोष राऊत यानी  यशस्वी केला . शेतीविषयीचे  ज्ञान अवगत नसताना प्रथमच पेरूची बागेची  जोपासना करून उत्पादन घेतले 

तामलवाडी शिवारातील  पेरू विक्रीसाठी परप्रांतात 

तामलवाडी शिवारातील कुसळ्या माळावर उत्पादीत केलेले तैवान जातीचे पेरू आंध्र,गोवा,कर्नाटक  राज्यात विक्रीसाठी गेले तेथील ग्राहकानी पेरूला अधिक पंसती देत गोडवा वाढवला  भावही चांगला मिळाल्याने लागवडीचा खर्च पहील्या उत्पादनात पदरी पडला आहे 

संतोष राऊत  , शेतकरी तामलवाडी
शेतीचे ज्ञान अवगत नव्हते अन्य पिके घेण्यापेक्षा फळबाग लागवडीतुन उत्पादन मिळते सेन्द्रीय खताचा वापर करून विष मुक्त फळे घेण्याचा सल्ला बस्वराज मसुते यानी दिला त्यानुसार पावणेदोन एकरात 3 लाखांचे उत्पादन मिळाले  अवकाळी पावसाने शेवटच्या  टप्प्यात पाच टन पेरू बांधावर टाकावा लागला .



 
Top