काटी , दि . २२ : उमाजी गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत 22 गावात 1200 ' हेक्टर क्षेत्र द्राक्ष बाग लागवडीखाली असुन सव्वा तिनशे शेतकऱ्यानी द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे.
काटी भागातील शिवार कुसळ्या माळरानाचा म्हणुन ओळखला जातो सिंचनाचा प्रश्न साठवण तलावामुळे सुटला आहे माळरान जमीनीची मशागत करून उस शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यानी माळरान जमीनीवर द्राक्षबागा उभ्या केल्या दोन वर्षात भागातील शिवारात 1200 हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आले आहे. माळरानावर उत्पादीत होणारी द्राक्षे परदेशात निर्यात होत आहे.यंदा हवामान खराबामुळे द्राक्ष उत्पादकाच्या एकरी खर्चात वाढ झाली जानेवारी महीन्या पर्यंत महागडी औषधे फवारून जोपासावी लागली. यासाठी एकरी साडे तीन लाखाचा खर्च साडेचार लाखावर पोहचला आहे. द्राक्ष हंगामात उत्पादीत केलेली द्राक्षे परदेशात निर्यात करण्यासाठी 325 शेतकऱ्यानी कृषी विभागाकडे रितसर नोंदणी केली आहे. यंदा या भागातुन 500 ते 600 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे परदेशात निर्यात होतील असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या भागात जळकोटवाडी , वडगाव (काटी ), मांळुब्रा , गंजेवाडी , सांगवी ( काटी ) पिपंळा खुर्द , सावरगाव या गावचा शिवार द्राक्षाचे कोठार म्हणुन उदयास आली आहेत.
येथे विविध जातीच्या द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते . तर भागातील तरूण वर्ग नौकरीच्या मागे न लागता द्राक्ष शेतीकडे वळला आहे विविध प्रयोग द्राक्षबागेत करून दर्जेदार उत्पादने घेत आहे.
द्राक्ष निर्यातीकडे कल वाढला
काटी मंडळात 1200 हेक्टर क्षेत्र द्राक्ष बाग लागवडीखाली आले. परदेशात द्राक्ष निर्यातीसाठी 325 शेतकऱ्यानी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे पाचशे हेक्टर पर्यंत द्राक्षे परदेशात निर्यात होवु शकतील '
आनंद पाटील , मंडळ कृषी अधिकारी
काटी
खराब हवामान व अवकाळी पावसाने द्राक्षबागेच्या एकरी खर्चामध्ये ५० हजाराची वाढ झाली. ढगाळ वातावरण, थंडीमुळे द्राक्ष मण्याची फुगवण मंदावते , भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे औषधे फवारणीचा खर्च वाढू लागला आहे.
निखील वडणे ,द्राक्ष उत्पादक , मांळुब्रा