मनसेच्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हारुग्णालयात आरोग्य सेवा सुरु - शहरात साखर वाटून पदाधिका-यांनी केला आनंदोत्सव
नळदुर्ग , दि . २१
शहरातील उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सातत पाठपुरावा व आदोंलन केले . त्यास अखेर यश आले. शुक्रवार दि. २१ जानेवारी रोजी नळदुर्ग येथिल उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला .
शहर व परिसरातील ७० पेक्षा आधिक गावे , वाडी , तांड्यावरील नागरिकाना आरोग्य सुविधा वेळेवर मिळावी या हेतुने मनसेने अनेक
आक्रमक आंदोलने केली. मुख्यमंत्री, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह संबंधिताकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून रेंगाळलेल्या इमारती समोर घंटानाद आंदोलन, पोस्टर वॉर ,स्वातंत्र्य दिनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण,रुग्णालयाच्या इमारतीमध्ये पक्ष कार्यालय, इमारतीचे प्रतीकात्मक उद्घाटन,असे आंदोलने केली. त्याचबरोबर दि . २६जानेवारी पर्यंत हे रुग्णालय सुरु करा अन्यथा २८जानेवारी रोजी आरोग्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास कड़े लोट करू अशा सहाव्या आन्दोलनाच्या तयारीत मनसेचे पदाधिकारी होते,परंतु दि .२१ जानेवारी रोजी सदर इमारत आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करून आरोग्य सेवा सुरु केली आहे.
येत्या महिनाभरात सर्व सुविधा सुरु करण्यात येईल अशी ग्वाही उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मुल्ला यांनी मनसेच्या पदाधिका-यांना लेखी पत्र दिल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी दि.२८जानेवारी रोजी करण्यात येणारे आंदोलन स्थगित केल्याचे कळविले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार हा विषय लावून धरला. त्यामुळेच हे रुग्णालय सुरु झाले आहे . मनसेच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने व नव्याने रुजू झालेल्या स्टाफचा मनसेने सर्वात प्रथम सत्कार केल्याबद्दल सर्वत्र पदाधिका-यांचे आभिनंदन होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा सुरु झाल्याने मनसेच्या पदाधिका-यांनी शहरात साखर वाटत आनंद व्यक्त केला आहे, यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, शहर संघटक रवि राठोड़, मनविसे सचिव आवेज इनामदार, अमीर फुलारी आदि उपस्थित होते.