मुरूम, ता. उमरगा, दि .२० :
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. या कार्यकाळात अनेक संकटांचा सामना देशाला वेगवेगळ्या पातळ्यांवर करावा लागला आहे. या प्रगतीची घोडदौड करत असताना गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमध्ये संपूर्ण जग अडचणीत सापडले आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी संपूर्ण मानवजातीने एकमेकांप्रती स्नेह, बंधूभाव, आपुलकी व सामंजस्याची भावना जोपासली पाहिजे असे प्रतिपादन पुणेचे तानाजी डोईफोडे यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरुम येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या वतीने ओम शांती केंद्रात गुरुवारी रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त कॅप्टन शंकरराव वाघ होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी तानाजी डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, ब्रह्माकुमारी अनिता दीदी, शिल्पा दीदी, सारिका दीदी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी शंकरराव वाघ म्हणाले की, देश सेवेबरोबरच मानवसेवा करण्याची संधी मला माझ्या आई-वडिलांमुळे मिळाली. त्यामुळे त्यांचे संस्कार मला जीवन जगत असताना सतत प्रेरणा व प्रोत्साहित करतात. शंकर पातळे, रतन पटेल, बाळराजे भालकाटे, शिवकुमार ढाले आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविकपर मनोगत ब्रह्मकुमार राजूभाई भालकाटे यांनी केले. सुत्रसंचलन व आभार प्रा. करबसाप्पा ब्याळे यांनी मानले.