कळंब , दि . २० : 

 तालुक्यातील मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव  शिंदे यांचे वडील साहेबराव रामा शिंदे यांचे दि.१८ जानेवारी२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी  धार्मिक ,पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी केला. अंत्यविधीच्या पारंपरिक पद्धतीच्या तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन कार्यक्रम असतो, परंतु शिंदे कुटुंबाने समाजाला दिशादर्शक पद्धतीने रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम केला.


कुटुंबातील मोठा मुलगा महादेव शिंदे यांनी ठरविल्या प्रमाणे वडिलांची रक्षाविसर्जन नदी पत्रात न करता हि रक्षा आपल्या शेतात घेऊन या रक्षेत तीन वृक्ष रोपांची लागवड केली आहे. आगळा वेगळा कार्यक्रम करून समाजाला दिशा देण्याच्या माध्यमातून कार्य केले आहे. 


सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर रक्षा विसर्जन न करता यात झाडे लाउन वेगळा उपक्रम राबवला आहे. मयत साहेबराव शिंदे यांच्या पश्चात चार मुले ,एक मुलगी ,सुना नातवंडे असा परिवार आहे. या वृक्ष लागवडीला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते तथा माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समितीचे कळंब तालुका व्यवस्थापक बंडु ताटे,भारतीय बहुजन परिवर्तन सेना जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे ,सामाजिक कार्यकर्ते शाहू गायकवाड व शिंदे परिवार  यावेळी उपस्थित होते.
 
Top