वागदरी , दि . १८  :

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे व राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असताना  नळदुर्ग येथे भेट दिले . महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूच्या वतीने त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.


  याप्रसंगी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या हस्ते नळदुर्ग येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले .तसेच नळदुर्ग येथील पत्रकार प्रकाश गायकवाड यांची या पत्रकार संघाच्या मंत्रालयीन प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना ओळख पत्र देवुन त्यांचा  सत्कार करण्यात आला.


 यावेळी पत्रकार संघाचे सुनील बनसोडे,अरुण लोखंडे, दयानंद काळुंके, प्रकाश गायकवाड, ईरफान काझी, सचिन गायकवाड, किशोर धुमाळ,आदी उपस्थित होते.
 
Top