काटी , दि . १८
तुळजापुर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे ग्रामपंचायत कार्यालयमध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदाची निवडणूक पार पडली. चेअरमनपदी सतिश नारायण मगर तर व्हाईस चेअरमनपदी मधुकर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. आगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली. सर्व नवनिर्वाचित संचालकाची बैठक घेण्यात आली . त्यामध्ये सर्वानुमते चेअरमनपदी सतिश नारायण मगर तर व्हाईस चेअरमनपदी मधुकर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित संचालक मोहन जाधव, मारुती मगर, विजया मगर, भुजंग सूर्ते, सतिश मगर, नागनाथ मारडकर, अमृतराव मोठे, यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे सचिव सुधाकर लोंढे, एम बी पाटील, माजी सरपंच नागनाथ मगर,भीमराव मगर, अंनादा कदम, राजाभाऊ जाधव, रामदास मगर, सचिन मगर, सुदर्शन मगर, भिबिषण मगर, युवा नेते उमेश मगर,भुजंग मगर,जमीर शेख, प्रताप निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावकऱ्यांनी मला बिनविरोध चेअरमन पदाचा मान दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. व माझ्या पुढील कार्यकाळात मी सर्व जनतेसाठी काम करेन.
सतिश मगर
नुतन चेअरमन वि.का.सो.सांगवी (काटी).