काटी , दि . १८ :
काटी ता . तुळजापूर येथील प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षासह अनेकांचा आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, किंवा काटी ग्रामपंचायतच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतांनाच तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी प्रतापराव देशमुख, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतिश विलास देशमुख यांच्यासह जयाजी देशमुख, नाबाजी ढगे, राजेंद्र गाटे, अरुण गाटे, खंडू गावडे, आदींनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केले आहे.
गावच्या सर्वांगिण विकासासाठी उस्मानाबाद येथील शिवसेना कार्यालयात आमदार कैलास पाटील, कट्टर शिवसैनिक पंकज पाटील, नंदु जाधव, संतोष उबाळे, प्रशांत गावडे यांच्या उपस्थितीत आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
यापुढे आपण काटीसह परिसरात शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सयाजी देशमुख यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासह आगामी होणारी काटी येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप गटाला धक्का असल्याचे मानले जात आहे.