नळदुर्ग , दि . ०५ : विलास येडगे

 नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या नुतन पदाधिकारी व सदस्यांचा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      
नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेची नुतन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन पत्रकार संघटनेच्या नुतन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार शहरांतील विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.  


 या कार्यक्रमाचे आयोजन शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ताजोद्दीन शेख यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मुश्ताक कुरेशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बशीर शेख, सचिव गौस कुरेशी, कोषाध्यक्ष वसीम कुरेशी, अल्पसंख्याक सेलचे मिनहाजोद्दीन शेख आदीजन उपस्थित होते.
     

 यावेळी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, सचिव सुनिल गव्हाणे, उपाध्यक्ष आयुब शेख, प्रसिद्धिप्रमुख शिवाजी नाईक, सदस्य विलास येडगे, सुनिल बनसोडे, तानाजी जाधव, शोएब काझी, अजित चव्हाण, अनिल जाधवर यांचा मुश्ताक कुरेशी, महेबुब शेख, ताजोद्दीन शेख, बशीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      
 यावेळी बोलताना मुश्ताक कुरेशी यांनी म्हटले की शहरातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असुन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न पत्रकार करतात असे सांगितले. यावेळी आयुब शेख यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बशीर शेख यांनी केले तर आभार सुनिल बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद पवार, पिंटू पुदाले, दीपक सुरवसे, हाजी बेग यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top