कळंब ,दि . ०४  

तालुक्यातील हसेगाव के. येथील पर्याय सामाजिक संस्था आणि अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. च्या कार्यालयात दि.03 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमचे पूजन करून माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, 

यावेळी पर्यायचे कार्यवाहक तथा अनिक चे व्यवस्थापकीय संचालक  विश्वनाथ तोडकर आणि सौ. अनिताताई तोडकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर इंजि. दशरथ धुमाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन अभिवादन करण्यात आले.


 यावेळी अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. चे ऑपरेशन हेड विलास गोडगे, शाखा व्यवस्थापक भिकाजी जाधव, लेखापाल विकास कुदळे, शुभांगी गोडगे, क्षेत्रीय अधिकारी बालाजी शेंडगे, आश्रुबा गायकवाड, वैभव चोंदे आदी उपस्थित होते.
 
Top