नळदुर्ग , दि . ०४

 युनिटी मल्टिकाँन्स नळदुर्गच्या वतीने नळदुर्ग किल्यामध्ये क्रन्तिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने नळदुर्ग किल्यामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी नळदुर्ग नगरीचे माजी नगरअध्यक्ष  शाहबाज काझी,  आरोग्य केंद्राचे महिला वैद्यकीय अधिकारी श्रद्धा कदम , प्रसिद्ध वकील अमोल गुंड, पत्रकार आयुब शेख' मनीषा सरवदे आदी उपस्थित होते.


यावेळी सर्व मान्यवराचे जुबेर काझी यांनी स्वागत केले. तर सर्व महिला कर्मचारी यांचा सत्कार डॉ. श्रद्धा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहबाजजी काझी,अमोल गुंड, श्रीमती डॉ.श्रद्धा कदम, मनीषा सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनायक अहंकारी यांनी मानले.
 
Top