जळकोट,दि.४ : मेघराज किलजे 

येथून जवळच असलेल्या जळकोटवाडी (नळ) ता . तुळजापूर  येथील इंदिरा काळे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आग्रा (उत्तरप्रदेश) येथे पार पडलेल्या थोडा स्पोर्टस्  कॅरेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंदिरा काळे प्रशालेचा  दहावीचा विद्यार्थी कु. प्रसाद दिनेश राठोड याने गोल्ड मेडल पटकावले तर त्याचा बंधू  आठवीचा विद्यार्थी कु. यश दिनेश राठोड याने सिल्वर मेडल पटकावले.


इंदिरा काळे प्रशालेत झालेल्या एका कार्यक्रमात कु. प्रसाद राठोड व कु. यश राठोड या दोघा बंधूंचा शाळेच्यावतीने गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातून या दोघा बंधूनी मिळवलेले क्रीडा स्पर्धेतील यश हे अतुलनीय आहे. असे विचार प्रशालेचे मुख्याध्यापक गहिनीनाथ काळे यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव काळे, मुख्याध्यापक व सचिव गहिनीनाथ काळे, संस्थेचे उपाध्यक्ष यु.जी. शिंदे, शाळेचे सहशिक्षक जे.डी. तांबे,बी.यु. डावरे,एस.एस.मडोळे,व्ही. एम. कागे,एस.एस. स्वामी, पालक दिनेश राठोड, योगेश कदम,प्रा. गायकवाड, सेवक लक्ष्मण देडे,बालाजी कोळी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top