लातूर दि .  २९ : 


संस्कार भारती  उस्मानाबाद  जिल्ह्याच्या वतीने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त  राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक डॉ. सतीश महामुनी यांनी केले आहे.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये मराठी भाषेमधून तीन हजार शब्दांचा निबंध स्पर्धकांनी सादर करावा. सदर निबंध कागदावर लिहून अथवा कॉम्प्युटर वर टाईप करून पाठवावा याशिवाय स्पर्धकांनी युनिकोड मधून सदर निबंध ईमेल केला तरी स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे.  सदर निबंध २८ फेब्रुवारी पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही स्पर्धा खुल्या गटातील असून सर्व वयोगटातील स्पर्धक यामध्ये सहभागी होऊ शकतात मराठी भाषेतील आपले निबंध असावेत शब्दमर्यादा ३ तीन हजार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत, यांच्यासह नागरिकांनी  आपले निबंध पाठवावेत असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. 


निबंध लेखनाचा विषय १. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष : प्रगती आणि वास्तव २. भारताच्या विकासाची 75 वर्ष : तुलनात्मक मूल्यमापन या दोन विषयावर स्पर्धकांनी आपले निबंध पाठवावेत असे आवाहन संयोजक डॉ. सतीश महामुनी, जिल्हाध्यक्ष शामसुंदर भन्साळी, कार्याध्यक्ष शेषनाथ वाघ, महामंत्री प्रभाकर चोराखळीकर, उपाध्यक्ष पद्माकर मोकाशे, उपाध्यक्ष बालाजी मक्तेदार, उपाध्यक्ष शरद वडगावकर यांनी केले आहे. 


स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ पाच पारितोषिके दिली जातील. आपले निबंध संयोजक डॉ. सतिश महामुनी विश्वास नगर तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या पत्त्यावर  अथवा satish.mahamuni100@gmail.com यावर युनिकोड मधून पाठवावेत.
 
Top