नळदुर्ग ,दि. २९ :


येथिल वसंतनगर (नळदुर्ग ) रहिवाशी असलेले  महावितरण कर्मचारी धनराज खेमा राठोड यांचे वयाच्या  ५२ व्या वर्षी अल्पशा अजाराने शनिवार दि . २९ जानेवारी पहाटे ३ वाजता निधन झाले. ते नळदुर्ग नगरपालिकेच्या 
बालकल्याण सभापती सौ. छमाबाई राठोड यांचे पती होत.


 धनराज राठोड हे  बीड येथिल महावितरण कार्यालयात लाईनमेन म्हणुन कार्यरत होते. 

 त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका छमाबाई धनराज राठोड ,  चार मुले  तीन सुने ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वसंतनगर येथिल स्मशानभुमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
Top