वागदरी, दि . २८ : 


दिनकर पाटील मित्रमंडळ येडोळा ता.तुळजापूर यांच्या वतीने पत्रकार किशोर धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.


  तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथील पत्रकार किशोर धुमाळ यांची नुकतेच भाजपा प्रसिद्धी विभाग तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल येडोळा येथील युवा कार्यकर्ते आभिषेक  ऊर्फ बंटी पाटील यांच्या पुढाकाराने दिनकर पाटील मित्रमंडळाच्या वतीने नळदुर्ग येथे त्यांचा  सत्कार करण्यात आला. 


यावेळी दिनकर पाटील, रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं तालुका संघटक सुरेश लोंढे, जयभीम वाघमारे, वाल्मिक वाघमारे, मोहन मिटकर, आभिषेक  ऊर्फ बंटी पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top