काटी , दि . ३३

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि.(23) रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 10 वाजता शिवसेना व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने  हिंदू ह्रदय सम्राट  शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती व आझाद हिंद सेनेचे  संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
    

यावेळी मनोगत व्यक्त करताना  सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रकार, लेखक, पत्रकार, परखड वक्ते ते राजकीय व समाजकारण असा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केल्याचे सांगत त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणं हीच खरी आदरांजली असल्याचे सांगितले.
          

यावेळी शिवसेनेचे नेते सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, ग्रामपंचायत सदस्य सतीश देशमुख, शिवसेना विभागप्रमुख संतोष उबाळे, प्रदीप साळुंके, पत्रकार उमाजी गायकवाड, ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, अतुल सराफ, धनंजय देशमुख, अनिल गुंड, नंदु जाधव, नाबाजी ढगे, प्रशांत गावडे,अप्पा बनसोडे, जुबेर शेख, श्रावण वाघमारे, राजेंद्र ढगे, सुनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top