चिवरी, दि . २४
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि.२३ रोजी हिंदुरुदय सम्राट सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रतिमेस सरपंच अशोक घोडके यांच्या हस्ते प्रतीमापुजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपसरपंच बालाजी पाटील, तंटामुक्त अध्यक्ष बलभीम मनशेट्टी, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, माजी उपसरपंच सुभाष जाधव, शिवसैनिक तानाजी जाधव, दिपक जाधव, लक्ष्मण कोरे, अंबादास देडे, नवनाथ शिंदे, मनोज आरगे, धनाजी पाटील, नितीन गायकवाड, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, कल्याण स्वामी , धनाजी कोरे, आदींसह शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.