उमरगा , दि . ०४
उमरगा तालुक्यातील येणेगुर गावामध्ये माजी सैनिकांचा भव्य नागरी सत्कार येणेगुर ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. वीस वर्ष सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले ज्यांनी देशासाठी सेवा केली, सत्कार मूर्ती विवेकानंद माळी यांचा गावातून आतंर्गत रस्त्यावरुन भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुष्प वर्षाव व फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणूक काढून येणेगुर गावातील हनुमान चौकात सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी सैनिक जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य व पंचायत समिती माजी सभापती राजासाहेब पाटील व दिलीप भालेराव , कैलास शिंदे , किरण गायकवाड, प्रा. दत्ता इंगळे, प्रशांत मुधकण्णा, येणेगुर गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ सुनंदा माळी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी परिसरातील माजी सैनिक , तसेच शाळेतील विद्यार्थी, गावातील तळागाळातील नागरिक यांची उपस्थित होती. सूत्रसंचालन शेषराव पाटील यानी केले.
कार्यक्रमाचे संयोजक व स्वागत समितीचे सर्व सदस्य योगीराज स्वामी, अमोल कुमार , स्वामी संतोष, कलशेट्टी शरद ,गायकवाड रमेश, गुंजवटे दीपक बेडगे, सुधाकर धामशेट्टी, विश्वनाथ स्वामी,
उपस्थित होते.