अणदूर , दि . ९
येथून जवळच असलेल्या खुदावाडी,ता. तुळजापूर येथे जेष्ठ समाजसेवक डॉ.सिद्रामपा खजुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येऊन,सर्वधर्मीय उपवर मुला मुली साठी" हिरकणी विवाह नोंदणी संस्था "स्थापना केली असून त्याच्या कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील मुला मुलींचे विवाह जुळवणे वरचेवर अवघड होत आहे, त्या साठी महिलांनी एकत्रित येऊन ही विवाह नोंदणी संस्था स्थापन्न केली असून याचा लाभ गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी घ्यावा असे आवाहन या संस्थेच्या अध्यक्षा सौ रेखाताई अहंकारी यांनी केले, नाममात्र फीस देऊन मुला मुलींची नोंद कागद पत्राच्या आधारे करण्यात येणार असून गरजू ना ही माहिती देऊन अनुरूप स्थळे सांगण्यात येणार आहेत महिलांनी वरचेवर अवघड होणारी विवाह जोडणी सोपी करण्यासाठी ही संस्था स्थापन्न केल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले, सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुदावाडीचे उपसरपंच पांडू बापू बोगरगे हे होते. यावेळी नागनाथ बोगरगे, सौ जयश्री कलकोटे,डॉ सिद्रामपा खजुरे, यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत अहंकारी यांनी केले तर आभार सौ शुभांगी अहंकारी यांनी मानले. कार्यक्रमास सरपंच शरद नरवडे, तुकाराम बोगरगे, शिवपुत्र कबाडे, वसंत सालगे,राम जवळगे आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पार्वती कबाडे, उर्मिला नरवडे, जयश्री इटलकर, सुनीता घोडके, मेहराज टिनवाले, महादेवी जाधव, निर्मला खजुरे, यशोदा खंदारे आदी महिलांनी पुढाकार घेतला.