जळकोट, दि.९ : मेघराज किलजे 


तुळजापूर तालुक्यातील जळकोट  व परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. 


प्रथमतः आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गानकोकिळा ,भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जळकोटवाडी येथील  दाजीबा काळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल व जळकोट येथील किरण सगर हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जळकोट व परिसरातील माजी सैनिक ऑर्डिनरी कॅप्टन बाबुराव जाधव, यशवंत कदम, कुमार मोरे, हरिदास लष्करे, कुंडलिक भोगे, राम किलजे, कुंडलिक कांबळे, ज्ञानदेव सगर, कोंडाप्पा कुंभार, राम कागे, गोकुळ कदम, राजेंद्र सगर, अरुण माने, माणिक सुरवसे, संजय स्वामी, दिगंबर जगदाळे, राजेंद्र कुंभार, परमेश्वर कुंभार, सुरेश भालेराव, सूर्यकांत सुरवसे, शिवदास गायकवाड, प्रभाकर सुतार, शिवाजी वागदरे, लक्ष्मण बारदाने, लहू कृष्णा कदम, बापू लष्करे व राजाराम लोखंडे या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती उपाध्यक्ष बबन मोरे,  मार्गदर्शक सुनील कदम, चेअरमन सचिन कदम, डॉ. संजय कदम, ब्रह्मानंद कदम, वीरभद्र पिसे, रवी चव्हाण, मनोज कदम, श्रीकृष्ण चव्हाण, ताजुद्दीन शेख, संजय पिसे, दगडू सुरवसे, दिनेश कलाल, नितीन माळी, सुनील कलशेट्टी, अप्पू किलजे. धनराज मडोळे, बालाजी जाधव, बालाजी पालम पल्ले ,नागनाथ कदम, व्यंकट बारदाने, औदुंबर भोगे, शाखाधिकारी पांडुरंग साखरे, कर्मचारी बालिका राजमाने आदीसह खातेदार,  व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज किलजे यांनी  केले.


जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ९ वा वर्धापन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. 

 
Top