नळदुर्ग , दि . ९ 
 

अजमेर येथील हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती रहेमतुल्ला अलै यांच्या ८१० व्या उर्स निमित्त नळदुर्ग  शहरातील विविध भागात  शहरातील विविध संघटनेच्या वतीने अन्नदान व महाप्रसाद (तबरुक) वाटपाचा कार्यक्रम दि . ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.


 याप्रसंगी  आजीजिया ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात  कुरान शरीफची  तिलावत करून करण्यात आली. यावेळी  हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जाहगिरदार,आलेम मोहम्मद रजा, हाफेज शफिक रजा, हाफेज मुदस्सर कुरेशी, हाफेज फारुख शेख, हाफेज फुरखान, हाफेज व खारी रफी आजम, हाफेज शब्बीर, हाफेज मुजफ्फर शेख, आलेम बादशाह, या धर्मगुरूंनी हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती रहेमतुल्‍ला अलै यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. 


यावेळी अलहाज मोहम्मद युसुफ कुरेशी, अब्दुल हकीम कुरेशी, अहेमद हुसेन कुरेशी, मुस्ताक कुरेशी, सलीम शेख, शफी  शेख, इमाम शेख, शरीफ शेख, एजाज सावकार,जिलानी कुरेशी, पत्रकार सुहास येडगे, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, अजित चव्हाण, अमर भाळे यांच्यासह अनेकजण  उपस्थित होते. 


हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वसीम कुरेशी, मोबीन कुरेशी,मन्सुर शेख, समदानी कुरेशी, मुनीर कुरेशी, तनवीर कुरेशी, अब्दुल हमीद कुरेशी, मैनोद्दीन कुरेशी, मोहसीन शेख, महेबुब बागवान, नवाज बागवान, सरफराज बागवान,जावेद कुरेशी आदीनी  परिश्रम घेतले. 

त्याचबरोबर हजरत सादेक शाह वल्ली दर्गाह येथे सुलतान ए हिंद ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व शहरातील सर्व धर्म गुरु उपस्थित होते. तसेच  रिक्षा स्टँड येथे रिक्षा संघटनेच्या वतीने  तर  उस्मानाबाद जनता बँकेच्या जवळ टिपू सुलतान ग्रुपच्या वतीने महाप्रसाद (तबरुक) चा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी अहमद तांबोळी, बिलाल कुरेशी, मोहम्मद अली कुरेशी, आयुब कुरेशी, गौस कुरेशी, वसीम कुरेशी, जलील शेख, राजू उस्ताद, असलम शेख, इरफान शेख ,मुख्तार शेख, शाहरुख अकडे, नवाज तांबोळी, समीर मौजन,अमान सय्यद, शकील मौजन, बाबा बागवान, मोहसिन शेख, असलम शेख, अलीम शेख,  कलीम शेख, युसुफ नदाफ, अब्दुल बारी कुरेशी, महंमद शेख, यांच्या आदीनी पुढाकार  घेतले.
 
Top