नळदुर्ग , दि . ९
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील ग्रामपंचायतची पिठाच्या गिरणीची चाचणी घेण्यात आली आहे. ग्रामस्थानी ग्रामपंचायतीची संपूर्ण चालु व थकबाकी भरणा करणा-या ग्रामस्थाना धान्य मोफत दळुन देण्यात येणार आहे.
खुदावाडी ग्रामपंचायतीचे सरपंच शरद गणपतराव नरवडे, उपसरपंच पांडूरंग बोंगरगे व सर्व ग्रा. प. सदस्य यांच्या प्रयत्नातून आपली गिरणी येथे गावातील मालमत्ता धारक ८ अ नुसार घरपट्टी, पाणीपट्टी संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना वर्षभर मोफत दळण दळून देण्यात येणार आहे.
त्याची दोन्ही (गहु,ज्वारी) गिरणीची चाचणी घेण्यात आली. यावेळी नरसाप्पा मातोलकर, संभाजी कापसे, अण्णा बोगरगे, विक्रम सांगवे, धनराज सालगे, नरसाप्पा मनुरे, सिद्धेश्वर मोलगडे, हणमंत मनुरे, भरत मेरू, नागनाथ खजुरे, राजेंद्र खजुरे, गिरणी मेकॅनिक विठ्ठल सुतार, अमोल मातोलकर,बाळू गायकवाड, नरवडे श्रीधर ,भास्कर व्हलदुरे,रामू सुरवसे,आदी उपस्थित होते.
तरी गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतची थकीत बाकी व चालू वर्षाची 31 मार्च 2022 पर्यंतची संपूर्ण कराचा भरणा करून मोफत धान्य गिरणीमध्ये दळून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.