वागदरी , दि . ९ : एस.के.गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथे शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरेंद्रसिंग ठाकूर तर उपाध्यक्ष पदी महेश बिरजदार यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस आय.टी.सेलचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वागदरी ता.तुळजापूर येथे शिवजयंती निमित्ताने शिव- बसव- राणा व काशिबा महाराज जन्मोत्सव समितीची बैठक नुकतेच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून या बैठकीत शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरेंद्रसिंग ठाकूर यांची तर उपाध्यक्षपदी महेश बिराजदार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून रामसिंग चव्हाण व रमेश पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिवजन्मोत्सवा निमित्त होणाऱ्या शिव सप्ताहाची रूपरेषा पुढील प्रमाणे तयार करण्यात आली आहे. दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर महाराज,महाराणा प्रतापसिंह महाराज व काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिव सप्ताहास सुरुवात होईल.. दि.19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या काळात वागदरीत भागवत सप्ताह असल्यामुळे तेच कार्यक्रम शिवजन्मोत्सवा निमित्ताने आयोजित सप्ताहाच्या कार्यक्रम पत्रिकेत असणार आहेत . दि.24 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. तर दि.25 फेब्रुवारीला सकाळी ठिक १० वाजता रक्तदान शिबिर व सायंकाळी ठीक सात वाजता हवामान तज्ञ पंजाबराव डक पाटील यांचे शेती विषयी आणि हवामानाविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि.२६ फेब्रुवारीला सकाळी शिवप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ठिक ७
ते १० वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढून या शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवहान यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी भारतसिंग,ठाकूर, प्रमोद बिराजदार , आदीसह गावातील शिवप्रेमी युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.